Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हॉटेल प्रेसिडेंट नजीक बसखाली ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटली

by Divya Jalgaon Team
December 9, 2020
in जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी । 1 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंट नजीक बसच्या चाकाखाली आलेल्या इसमाची ओळख पटली आहे. बसच्या चाकाखाली आलेल्या व ठार झालेल्या इसमाची एमआयडीसी पोलिस स्टेशनला मिसींग दाखल झालेली होती. सुधाकर साहेबराव खैरनार (वय-३८) रा. सुप्रिम कॉलनी असे ठार झालेल्या व्यक्तीने नाव आहे.

1 नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली ते रेमंड चौफुली दरम्यान हॉटेल प्रेसिडेंट नजीक जळगाव – श्रीगोंदा (एमएच ११ बीएल ९३८५) ही बस भरधाव वेगाने औरंगाबादच्या दिशेने जात होती. त्या बसच्या चालकाच्या बाजुकडील चाकाखाली एक इसम चिरडला गेला होता.

त्यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक इमरान सैय्यद व गोविंदा पाटील असे दोघे कर्मचारी गस्तीवर होते. त्यांनी बसच्या चाकाखाली आलेल्या अनोळखी इसमास तात्काळ वैद्यकीय उपचारार्थ देवकर रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले होते. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला बस चालकाविरुद्ध भादवि कलम २७९, ३०४(अ), मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेतील मयत इसमाचे नाव तपासाअंती सुधाकर साहेबराव खैरनार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर अपघाताची घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली होती. मात्र या घटनेतील मयत सुधाकर खैरनार याच्या भावाने तो १२ नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेल्याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला माहिती दिली होती. मयत सुधाकर खैरनार हा एकटाच सुप्रिम कॉलनीत रहात होता. मयताच्या भावाने अपुर्ण माहिती दिल्यामुळे तपास लागण्यास उशीर झाला. पोहेकॉ संजय धनगर यांनी सखोल तपास करून मयताची ओळख पटविली.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonहॉटेल प्रेसिडेंट नजीक बसखाली ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटली
Previous Post

जुन्या वादातून फरार असलेल्या संशयिताला अटक

Next Post

शहर वाहतूक शाखेच्या परिसरातून दुचाकी लंपास

Next Post
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

शहर वाहतूक शाखेच्या परिसरातून दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group