जळगाव प्रतिनिधी । चौघुले प्लॉट येथे जुन्या वादातून तरुणाला चार ते पाच जणांनी लोखंडी पाईपसह धारदार शस्त्राने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. यातील चार जणांना अटक करण्यात आली होती त्यातील फरार असलेला दिपक दत्तू चौधरी यांला शनीपेठ पोलीसांनी प्रजापत नगरातून मंगळवारी रात्री अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चौघुले प्लॉटमधील रहिवासी हितेश संतोष शिंदे (वय-२०) याचे काही महिन्यांपुर्वी याच परिसरातील दीपक दत्तू चौधरी याच्यासोबत वाद झाला होता. यावेळी दोघांच्या कुटुंबियांनी मध्यस्ती करून वाद मिटविला होता. दरम्यान रविवार ६ डिसेंबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास हितेश शिंदे हा मित्र प्रसाद चौधरी व रुपेश ठाकरे यांच्यासोबत गप्पा करीत कांचननगरातील कालिंका माता चौकात उभे होते. यावेळी मनोज दत्तू चौधरी उर्फ काल्या, महेश गोविंदा चौधरी उर्फ बंटी, विजय किशोर पाटील उर्फ टमाट्या (पुर्ण नाव माहिती नाही) सर्व रा. चौघुले प्लॉट हे तिघे त्याठिकाणी आले. मनोजसह दोघांनी टेन्ट हाऊसमधील लोखंडी पाईप हितेशच्या डोक्यात टाकला. यात हितेश गंभीर जखमी झाला. जखमीअवस्थेत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर दीपक चौधरीने हातातील धारदार पट्टीने हितेशवर वार करून गंभीर जखमी केले. तीन चार जणांकडून हितेशला मारहाण होत असतांनाच दत्तू चौधरीने हातात तलवार घेत याठिकाणी आला.
त्याने हितेशला शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हितेशला मारहाण होत असतांना विजय शिंदे व राहुल शिंदे या दोघांनी भांडण मिटवित हितेशला रुग्णालयात दाखल केले. शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिपेठ पोलिसात मनोज चौधरी, महेश चौधरी, विजय किशोर पाटील, दीपक चौधरी व दत्तू चौधरी यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
यापैकी दिपक चौधरी हा फरार होता. चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यातील फरार दिपक चौधरी याला शनीपेठ पोलीसांनी मंगळवारी रात्री प्रजापत नगरातून अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास परिस जाधव हे करीत आहे.