Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

श्री तिलोक छंद संग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री महेन्द्रऋषीजी म. सा. यांच्या पावन उपस्थितीत

by Divya Jalgaon Team
December 9, 2020
in जळगाव
0
श्री तिलोक छंद संग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

जळगाव – जैन दर्शनात श्री तिलोक छंद संग्रहाचे एक विशेष महत्त्व सर्वश्रुत आहे. भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन द्वारा मुद्रित आणि श्री जैन रत्न पुस्तकालय अहमदनगर द्वारे प्रकाशित श्री तिलोक छंद संग्रहाचे प्रकाशन हस्ती हीरा नगर स्थित जैन भवन येथे युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री महेन्द्रऋषीजी म. सा., आदि ठाना 5 तथा महासति परमपूज्य मंगलज्योतिजी म. सा. आदि ठाना 3 यांच्या पावन उपस्थितीत तसेच  संघपति दलिचंदजी जैन, उद्योगपति अशोक जैन, पूर्व महापौर प्रदीप रायसोनी, नगरसेवक अमर जैन, नेमिचंद चोरड़िया, स्वरूप लुंकड, महावीर बोथरा, मनिष लुंकड आणि नितीन चोपड़ा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संघ सेवाभाव, सहकार्याकरिता प्रदीपभाऊ रायसोनी आणि अशोकभाऊ जैन यांचा सत्कार ही करण्यात आला. सदरील पुस्तकाचे धर्मप्रेमी परिवारामध्ये वितरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पूज्य गुरूदेव श्री यांनी श्री तिलोक छंद संग्रहाचे स्वाध्यायात महत्त्व विषद केले आणि आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या साधनेत हे जीवनपर्य़ंत समाहित होते, असा गौरवपूर्ण उल्लेख केला. पुढे ते म्हणाले की, जळगाव श्री संघाची भारतवर्षमध्ये विशेष महानता राहिली आहे. मागील काळात श्रद्धेय भवरलालजी जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, स्वर्ण व्यवसायी रतनलालजी बाफना तथा सेवादास दलिचंदजी जैन यांनी यात सातत्य राखले. या सर्वांनी आपल्या निष्ठापूर्वक व्यहाराने आणि सर्वसमावेशकतेने ही परंपरा प्रवाहित केली. जैन भवन येथे संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात प्रशासनिक सूचनांचे पालन करत धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींची उपस्थिती राहिली.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonJalgaon Latest NewsMarathi Newsश्री तिलोक छंद संग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न
Previous Post

आमदारसाहेब, विकास कामांना कशासाठी खोडा घालतात?

Next Post

झंवरचे थक्क करणारे किस्से : असा झाला दीड हजार कोटी रुपयांचा मालक

Next Post
बीएचआर प्रकरणी ललवाणी बनले पुणे न्यायालयात त्रयस्थ अर्जदार

झंवरचे थक्क करणारे किस्से : असा झाला दीड हजार कोटी रुपयांचा मालक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group