जळगाव प्रतिनिधी । जळगावातील आशाबाबा नगरातून तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. १८ वर्षीय तरूणी ७ डिसेंबर रोजी सकाळी घरी काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. वडीलांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
वडील विजयसिंग बाबुलाल पाटील (वय-४६) रा. आशाबाबा नगर हे खासगी व्यवसाय करतात. घरी पत्नी आणि मुलगा आणि मुलगी सोबत राहतात. ७ डिसेंबर रोजी तरुणीने आईला कॉलेजला जाते असे सांगून घरातून सकाळी १० वाजेच्या सुमारास गेली. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने आई – वडीलांनी मैत्रिण आणि नातेवाईकांकडे संपर्क साधला असता, काहीही पत्ता लागला नाही. वडील विजयसिंग पाटील यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
तरुणीचे वर्णन शरीराने सडपातळे, उंची ५ फुट ४ इंट, रंगाने गोरी, चेहरा गोल, पंजाबी ड्रेस, लाल रंगाचा कुर्ता व सलवार, उजव्या गलावर बारीक तीळ असून कोणाला आढळून आल्यास रामानंद नगर पोलीस स्थानकात संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहे.