मेष : संततीच्या आरोग्याच्या तक्रारी राहतील. पित्तप्रकृती बळावण्याची शक्यता राहते. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल.
वृषभ : कौटुंबिक कलह टाळावेत मातेच्या तब्येतीची काळजी घ्यावी खिसापाकिट सांभाळावे. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.
मिथुन : महत्वाची कागदपत्रे वरिष्ठांना योग्य जबाबदार व्यक्तिच्याच हाती पाठवावीत भावंडांशी मतभेद टाळावेत. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील.
कर्क : आज आपल्याला मानसिक स्थैर्य प्राप्त होईल. छोटे प्रवास संभवतात. महत्वाची आर्थिक कामे आपण पुढे ढकलावीत. आपल्या वाक्चातुर्याने दुसऱ्यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : अश्रित व्यक्तिसाठी आर्थिक सहाय्य करावे लागेल. मानसिक चिंता सतावतील, वाहने जपून चालवा. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.
कन्या : मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने उत्तम दिवस आहे. आपली कामे मार्गी लागतील. गुंतवणूकीस आजचा दिवस अनुकूलआहे. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील.
तूळ : नोकरीतनिमित्त प्रवासयोग संभवतात. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या अनिश्चितता जाणवेल.
वृश्चिक : वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. धार्मिक शुभसमारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. हातून पुण्यकर्म घडेल.
धनू : संत सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरीत जबाबदारीची कामे करताना योग्य ती दक्षता घ्या. कामातील एखादी चूकआपल्या करिअरच्या दृष्टीने त्रासदायक ठरेल. आपली मते डळमळीत ठेवू नका. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. प्रवास घडून येतील.
मकर : संततीच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चिंता वाटेल. आज आपल्याला गूढशात्राच्या अभ्यासाविषयी ओढ वाटेल. आपल्याहातून धार्मिक. अध्यात्मिक विषयावरील लिखाण होईल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. एकमताने निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.
कुंभ : व्यवसाय वाढीसाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. मातुल घराण्यातील नातेवाईकांचे सहाय्य मिळेल वैवाहिक जोडीदारांशी मतभेद टाळावेत. कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल.
मीन : आपण कर्जासाठी केलेल्या अर्जास मंजूरी मिळण्याचा आज योग आहे. आज आपल्याला आपल्या भावंडांचा सहवासलाभेल. भावंडांबरोबर खरेदीस जाण्याचा योग येईल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील.