Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास!

उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना: प्रभाग ११ च्या नागरिकांच्या तक्रारींची घेतली दखल

by Divya Jalgaon Team
December 8, 2020
in जळगाव
0
हरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास!

जळगाव, – हरीविठ्ठल नगरातील मुख्य वर्दळीचा असलेल्या रस्त्यावर श्री साई मंदिरापासून खंडेराव नगरपर्यंत काही नागरिकांनी पक्के अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरुंद झाला असल्याची तक्रार उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे मांडण्यात आली. उपमहापौरांनी तक्रारीची दखल घेत रस्त्याची मोजणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी नगररचना अधिकाऱ्यांना दिल्या.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ११ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक ललित कोल्हे, संतोष पाटील, पार्वताबाई भिल, माजी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, मनोज आहुजा, चेतन सनकत, भारत कोळी, मनोज काळे, दीपक पाटील, कुंदन काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

अर्जुन नगरात ५० टक्के गटारी नाही
अर्जुन नगर गट क्रमांक १३४ मध्ये अनेक ठिकाणी अद्यापही गटारी आणि रस्ते नसल्याने नागरिकांचे हाल होत असतात. काही वर्षांपूर्वी घरांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले होते. परिसरातील ५०% गटारी पूर्ण झाल्या असून उर्वरित बाकी असल्याचे नागरिकांनी सांगितले. उपमहापौर सुनील खडके यांनी उर्वरित गटारींचे काम लवकरच करू असे आश्वासन दिले.

मुख्य नाल्याला संरक्षक भिंत उभारणार
हरीविठ्ठल नगरातील नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात नाल्याचे पाणी इतरत्र वाहू लागते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नाल्याला संरक्षक भिंत बांधल्यास ही समस्या सुटणार असल्याचे नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. उपमहापौरांनी याबाबत बांधकाम विभागाला योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच हरी विठ्ठल नगरच्या मुख्य रस्तालगत दोन्ही बाजुला गटारी कराव्या असेही उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले.

हरीविठ्ठलचा बाजार दुसरीकडे हटवावा
हरीविठ्ठल नगरात दर आठवड्याला बाजार भरतो. भाजी विक्रेत्यांमुळे वाहन ये-जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नसतो. काही दिवसापूर्वी बाजारासाठी मोकळ्या जागेवर हायमास्ट लावून व्यवस्था करून दिली होती. तरीही मुख्य रस्त्यावर बाजार भरतो. तो बाजार लवकरात लवकर हटविण्यात यावा अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच अतिक्रमण विभागाला सूचना देत रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonMarathi Newsहरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास!
Previous Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 10 अर्ज दाखल

Next Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, ९ डिसेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, ९ डिसेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group