धरणगाव (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या जांभोरा गावाजवळ एका दुचाकीला झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील जांभोरे गावाजवळ धरणगावकडे येणारी एक दुचाकी अचानक घसरली. त्यात लक्ष्मण विठ्ठल माळी (वय 30, रा. भिलाली ता.अमळनेर) हा तरुण जागीच ठार झाला. तर भिकन विठ्ठल माळी (वय 27) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे विलास लांबोळे, राजेंद्र ठाकरे, योगेश वाघ आदी पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली आहे.