जामनेर;- येथे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी पास केलेल्या शेतकरी बिलाच्या विरोधात जामनेर येथे शेतकरी बांधवांचा तीव्र आंदोलन करण्यात आले.
तसेच या आंदोलनात जामनेर ता.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला . केंद्र शासनाने जे बिल पास केले ,त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी रा.कॉ.महिला प्रदेश अध्यक्षा वंदना ताई चौधरी ,किशोर पाटील राजू पाटील दिपक रिच्छवाल .शिवसेनेच्या वतीने विश्वजित पाटील ,सुधाकर सराफ,ऍड.भरत पवार ,पवन माळी.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शंकरभाऊ राजपूत, शरद पाटील , दीपक राजपूत या पदाधिकारी सह जामनेर पंचक्रोशी तील शेतकरी बांधव उपस्तीत होते. जामनेर शहरातील मुख्य आठवडे बाजार ,ब.ओ.टी मार्केट न.पा.चौक गांधी चौक या ठिकानि सर्व व्यापारी यांच्या वतीने भारत बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.