अमळनेर- दिल्लीत आज भारत बंद करत शेतकरी आंदोलन करण्यात आहे. या आंदोलनास अमळनेर महाविकास आघाडीने पाठींबा दिला असून शहरात बंद आंदोलन करण्यात येत आहे.
याप्रसंगी शहरातील विजय मारूती मंदीराजवळ महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, किसान मोर्चा यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने बंद रॅलीला सुरूवात करण्यात आली.
यावेळी अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे बी.के. सूर्यवंशी, शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, भारती गाला, किसान मोर्चाचे रमेश पाटील, जगदाळे , प्रा. विश्वास पाटील, बन्सीलाल भागवत, इम्रान खाटीक, प्रताप शिंपी, मुख्तार खाटीक, शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पाटील, गोविंदा बाविस्कर, अरुण देशमुख, भागवत पाटील, बाळू पाटील, अरुण शिंदे, गौरव पाटील आदी उपस्थित होते.