मेष : आज आपल्या नवीन घरगुती व्यवसायाच्या शुभारंभ करण्यास अनुकूल दिवस आहे. नवीन वस्तूंची खरेदी कराल.आजचा दिवस आपल्यासाठी भाग्यकारक घटनांची पर्वणीच आहे. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल.
वृषभ : नोकरीतील मुलाखतीसाठी पत्र येईल. अपेक्षित गाठीभेटींचे आज योग आहेत. आपली मते आपण ठामपणे मांडाल व त्यावर अमलबजावणी करून घ्याल. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल.
मिथुन : सुवर्णखरेदीचा योग आहे. घरातील पूर्वनियोजित शुभसमारंभ पार पाडण्यासाठी आप्तस्वकियांची हजेरी लागेल. आर्थिक उन्नतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस आपल्या चांगल्या विचारांना प्रोत्साहन देणारा राहील. विश्वासाच्या जोरावर ध्येय गाठाल.
कर्क : आपले मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मुलांच्या शिक्षणाच्या संबंधीत असणाऱ्या प्रश्नांवर योग्य मार्ग निघेल. अचनाक अनावश्यक खर्च उद्भवतील. कामानिमित्तच्या घडणार्या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.
सिंह : मित्र परिवाराबरोबर सहलीचे योग संभवतात, आज अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. आपल्या मृदु भाषणामुळे विरोधकांची मने जिंकून घ्याल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. इच्छापूर्ती होईल.
कन्या : आपल्याला गुंतवणूक करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. महत्वाच्या गाठीभेटीतून अपेक्षित घडामोडी घडतील.आपले अंदाज अचूक ठरतील. नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील.
तूळ : आज आर्थिक उलाढाली टाळाव्यात. नोकरी-व्यवसायाच्या वाढीसाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराच्याआर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा र्दीवस अनुकूल आहे. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल.
वृश्चिक : आपल्या इच्छापूर्तीच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. भाग्यकारक घटनांच्या दृष्टीने आजचा दिवसशुभ आहे. आज आपल्या मित्रमैत्रिणींचे आपणांस सहकार्य मिळेल. अंधःश्रद्धेला बळी पडू नका. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळावे. व्यावसायिक वादंग टाळावेत.
धनू : व्यवसायातील जुनी येणी आज वसूल होतील. नोकरीत भाग्यकारक घटना घडतील. आपले कार्यक्षेत्र वाढल्यामुळे तेवेळत पूर्ण करण्याच्या दृष्टीने मनाची चलबिचल होईल, एखाद्या व्यक्तिच्या मदतीची गरज भासेल. भागीदारीत व्यवसाय करणार्या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय घेणे गरजेचे आहे.
मकर : आजचा दिवस आपल्या संततीस शैक्षणिक-क्रीडा क्षेत्रात प्रगतीकारक ठरेल, आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीतकाही भाग्यकारक घटना घडतील. मित्र परिवाराला सहाय्य करावे लागेल. आपल्या इच्छा, अपेक्षा स्वतःच्या काबूत ठेवाव्यात. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल.
कुंभ : आपले मन अस्वस्थ राहिल. मुलांच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. आज नोकरीत आर्थिक उन्नती होईल व आपल्यावरनवीन कामाची जबाबदारी वरिष्ठ सोपवतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. स्थावर मालमत्ता व्यवहारातून आर्थिक लाभ होतील.
मीन : संततीसौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी आजचा दिवस चांगला आहे.संतसज्जनांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हातून धार्मिक लिखाण होईल. महिला स्वतःच्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल.