Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चौघुले प्लॉटमध्ये जुन्या वादातून तरुणास बेदम मारहाण

by Divya Jalgaon Team
December 7, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील गुरूनानक नगरात दोन गटात हाणामारी

जळगाव- रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट येथे जुन्या वादातून तरुणाला चार ते पाच जणांनी लोखंडी पाईपसह धारदार शस्त्राने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील चौघुले प्लॉटमधील रहिवासी हितेश संतोष शिंदे (वय-२०) याचे काही महिन्यांपुर्वी याच परिसरातील दीपक दत्तू चौधरी याच्यासोबत वाद झाला होता. यावेळी दोघांच्या कुटुंबियांनी मध्यस्ती करून वाद मिटविला होता. मात्र रविवार ६ डिसेंबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास हितेश शिंदे हा मित्र प्रसाद चौधरी व रुपेश ठाकरे यांच्यासोबत गप्पा करीत कांचननगरातील कालिंका माता चौकात उभे होते. यावेळी मनोज दत्तू चौधरी उर्फ काल्या, महेश गोविंदा चौधरी उर्फ बंटी, विजय किशोर पाटील उर्फ टमाट्या (पुर्ण नाव माहिती नाही) सर्व रा. चौघुले प्लॉट हे तिघे त्याठिकाणी आले.

तर मनोजसह दोघांनी टेन्ट हाऊसमधील लोखंडी पाईप हितेशच्या डोक्यात टाकला. यात हितेश गंभीर जखमी झाला. जखमीअवस्थेत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दीपक चौधरीने हातातील धारदार पट्टीने हितेशवर वार करून गंभीर जखमी केले. तीन चार जणांकडून हितेशला मारहाण होत असतांनाच दत्तू चौधरीने हातात तलवार घेत याठिकाणी आला. त्याने हितेशला शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हितेशला मारहाण होत असतांना विजय शिंदे व राहुल शिंदे या दोघांनी भांडण मिटवित हितेशला रुग्णालयात दाखल केले. शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी शनिपेठ पोलिसात मनोज दत्तू चौधरी उर्फ काल्या, महेश गोविंदा चौधरी उर्फ बंटी, विजय किशोर पाटील उर्फ टमाट्या, दीपक दत्तू चौधरी व दत्तू कडू चौधरी सर्व रा. चौघुले प्लॉट यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी दत्तू चौधरी हा फरार आहे.

Share post
Tags: crimeDivya JalgaonJalgaonMarathi Newsचौघुले प्लॉटमध्ये जुन्या वादातून तरुणास बेदम मारहाण
Previous Post

नूतन मराठा महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

दूध, साखर आणि चहा पावडर महागल्याने सर्वसामान्यांना झटका

Next Post
दूध, साखर आणि चहा पावडर महागल्याने सर्वसामान्यांना झटका

दूध, साखर आणि चहा पावडर महागल्याने सर्वसामान्यांना झटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group