जळगाव – आमदार राजूमामा भोळे यांनी काही रविवारी पत्रकार परिषद घेऊन शहरातील सागरपार्क जागा हडप करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सुपारी दिल्याचे आरोप लावले होते.
या मुद्द्यावरून आमदार राजूमामा भोळे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आमदारांनी शहराचा विकासाच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला.
शहरातील सागरपार्क जागा हडप करण्यासाठी १०० कोटी रूपयांची सुपारी महाविकास आघाडी सरकारने घेतली असा आरोप आमदार राजूमामा भोळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर आज पत्रकार परिषद घेण्यात आली,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख अभिषेक पाटील, मनपा विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादीचे ॲड. कुणाल पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.