नवी दिल्ली- दिल्ली पोलिस स्पेशल सेल कडून आज सकाळी दहशतवादी संघटनेशी निगडीत असलेल्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या शकरपूर भागात झालेल्या चकमकीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २ जण पंजाब आणि ३ जण कश्मीरचे असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज सकाळी दिल्लीच्या शकरपूर भागात झालेल्या चकमकीनंतर स्पेशल सेलने कारवाई केली आहे. यामध्ये ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांकडून हत्यारं जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती स्पेशल सेल डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी दिली आहे. नार्को टेरिझमसाठी या समुहाचा आयएसआय ला पाठिंबा होता. आतंकवादी संघटनेच्या नावाची अद्याप खात्री होणं बाकी असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
तसेच प्राप्त माहितीनुसार, पूर्व दिल्ली भागातून लक्ष्मी नगर, शकरपूर भागात स्पेशल सेल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली यामध्ये दोघांकडूनही फायरिंग झाले असून, यावेळी एकूण १३ राऊंड झाडण्यात आले आहेत. याप्रकरणी स्पेशल सेल अधिक तपास करत आहे.