मुंबई | टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळे निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार चालू होते.
कोरोना पॉझीटिव्ह सापडल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिच्यावर उपचार चालू असताना दिव्याचं निधन झालं आहे. गोरेगावच्या एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सेवन हिल्समध्ये दिव्याला नेण्यात आलं असल्याची माहिती आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर दिव्याची आक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती आहे. तिच्यासोबत तिची आई रूग्णालयात होती.
दरम्यान, दिव्याच्या पतीने तिला धोका दिला असून त्याने दिव्याला सोडून दिलं असल्याचा आरोप दिव्याच्या आईने केला आहे.