Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगाव येथे गोळीबार करणारे दोघे जेरबंद

by Divya Jalgaon Team
December 7, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
माहेरून १ लाखासाठी विवाहीतेचा छळ

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील हुडको कॉलनीत युवकावर गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला करणार्‍या दोघा दुचाकीस्वार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे व मालेगावातून ताब्यात घेतले आहे.

२८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता शेख मोहम्मद साबीर मोहम्मद गालीब (वय २५, रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव) हा मदिना मशीदजवळ गप्पा मारत होता. त्यावेळी दोघांनी शेख मोहम्मद याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर गोळीबार करणारे फरार झाले होते.

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याबाबत पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले होते. त्यानुसार विजयसिंग पाटील, सुधाकर अंबुरे, रामकृष्ण पाटील, राहुल पाटील यांना चाळीसगावला रवाना करण्यात आले होते. त्यांनी तपासाची चक्रे फिरवून अरबाज दाऊद पिंजारी (रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) व शोएब शेख असलम उर्फ माया (रा. चाळीसगाव) या दोन आरोपींना अटक केली आहे.

Share post
Tags: ChalisgaoncrimeDivya JalgaonJalgaonचाळीसगाव येथे गोळीबार करणारे दोघे जेरबंदजेरबंद
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, ७ डिसेंबर २०२०

Next Post

बीएचआर घोटाळा अटकेतील पाचही संशयितांना न्यायालयीन कोठडी

Next Post
बीएचआर प्रकरणी ललवाणी बनले पुणे न्यायालयात त्रयस्थ अर्जदार

बीएचआर घोटाळा अटकेतील पाचही संशयितांना न्यायालयीन कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group