मेष : आज आपले अंदाज चुकतील कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय योग्य असले तरी त्यांची अमलबजावणीकरणे टाळावे. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामांची जबाबदारी सोपवतील. जवळचे प्रवास सुखकर होतील.
वृषभ : कौटुंबिक कलह टाळावेत. नोकरीत कामाचा ताण जाणवेल, आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्चर्याचा धक्का बसेल.
मिथुन : आपले पूर्वी ठरलेले प्रवास अचानक रद्द करावे लागतील. आपल्या तब्येतीच्या आज तक्रारी राहतील. आपल्यालामिळणार्या अनुकूल संधी अचानक हुकतील. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल.
कर्क : आपल्या व्यवसायातील जुनी येणी काही प्रमाणात वसूल होण्याचे योग आहेत. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.
सिंह : कौटुंबिक वादात संयम पाळा. आपली मते जोडीदारावर लादू नका. उधारी उसनवारीचे व्यवहार टाळा. आपली आजवर रेंगाळलेली कामे प्रतिष्ठित व्यक्तिंच्या सहकार्याने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
कन्या : आपल्या संततीच्या परदेश प्रवासाच्या दृष्टीने काही अडचणी उद्भवतील. उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना करण्यास चांगला काळ आहे. अनुकूल घडामोडी घडतील.
तूळ : प्रिय व्यक्तिंच्या भेटीगाठी झाल्यामुळे विचारांची देवाणघेवाण करता येईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे.
वृश्चिक : पूर्वी आपण केलेल्या चांगल्या कामाची वरिष्ठ प्रशंसा करतील. आपले कामातील अधिकार वाढण्याच्या दृष्टीने तीआपल्याला मिळालेली पोच असेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल.
धनू : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या संधी येतील. व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल.
मकर : वाहने चालवताना आज खबरदारी घ्यावी. दुसऱ्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या.
कुंभ : भागिदारीत व्यवसाय करणार्यांचे आज कार्यक्षेत्र वाढेल. आपले आरोग्य उत्तम राहिल. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील.कामानिमित्त प्रवास घडून येतील.नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील.
मीन : विरोधकांपासून सावध रहा. आपले विचार दुसर्यांना पटवून देण्याच्या दृष्टीने आग्रही वृत्ती धरू नका. आज आपण जास्त शारिरीक कष्ट घेऊ नका. घरात शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. घरातील वातावरण आनंदी राहील. मातृसौख्य लाभेल.