Saturday, April 4, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सागर पार्क हडपविण्यासाठी १०० कोटींची सुपारी – आ. भोळेंचा सनसनाटी आरोप

by Divya Jalgaon Team
December 6, 2020
in जळगाव, राजकीय
0
जिल्हा भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांप्रकरणी आ. राजूमामा भोळेंची तक्रार

जळगाव- आज भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी सनसनाटी आरोपी केला की,  शहरातील सागर पार्कची जागा आरक्षणातून वगळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने १०० कोटी रूपयांची सुपारी घेतली.

महाविकास आघाडीकडून भाजपावर विविध आरोप होत आहेत, तसेच वॉटरग्रेस प्रकरणी आमदार गिरीश महाजन यांचे प्रसारमाध्यमांमध्ये नाव घेतले जात असल्याबद्दल आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी परिषदेला आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे व विशाल त्रिपाठी यांची उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत आमदार राजूमामा भोळे यांनी वॉटरग्रेस प्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच सदर पत्रकार परिषदेत आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, शहरातील सागरपार्कची जागा हडप करण्यासाठी १०० कोटी रूपयांची सुपारी देण्यात आलेली आहे. ही सुपारी महाविकास आघाडी सरकारतर्फे देण्यात आली असून ही जागा आरक्षणातून वगळण्यात यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने ही जागा महापालिकेच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट केले असले तरीही हा प्रकार होत आहे. एक वकील आणि एक महिला हे आयुक्तांवर यासाठी दबाव आणत असल्याचा गौप्यस्फोट सुध्दा राजूमामा भोळे यांनी केला.

त्याचप्रमाणे कोल्हे यांच्या भूखंडाच्या प्रकरणात लाठी वकिलांनी कमिशन घेतले असल्याचा आरोप राजूमामा भोळे यांनी याप्रसंगी केला. राठी वकिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली. तर आता सुध्दा सागर पार्कच्या जागेसाठी १०० कोटी रूपयांची मागणी करण्यात येत आहे. वॉटरग्रेस प्रकरणी अनेक गावगप्पा सुरू असतांना हे प्रकरण त्यापेक्षा किती तरी पटीने मोठे असल्याचे राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले.

Share post
Tags: #BJP ConferencebjpDivya JalgaonJalgaonJalgaon newsMarathi NewsRaju mama Bholeसागर पार्क हडपविण्यासाठी १०० कोटींची सुपारी - आ. भोळेंचा सनसनाटी आरोप
Previous Post

भाजपातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे भारत बंदला प्रतिसाद

Next Post

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे भारत बंदला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group