जळगाव- अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जळगावच्या वतीने होणाऱ्या ८ डिसेंबर रोजीच्या भारत बंदला प्रतिसाद दिला आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना, व्यापारी असोसिशन, सर्व मार्केटचे अध्यक्ष , ट्रक व रिक्षा असोशियन यांना आवाहन करण्यात आले असून दिनाक 8 डिसेंबर मंगळवार रोजी संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळून अन्न दात्यांसोबत उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी प्रतिभा शिंदे ,मुकुंद सपकाळे, सुरेंद्र पाटील, सचिन धांडे, करीम सालार, फारुक कादरी, विष्णू भंगाळे, राम पवार, अमोल कोल्हे, शाईद अली, विजय पवार , दिलीप सपकाळे, रवी देशमुख, भरत कर्डिले, गफार मलिक, नंदू आप्पा पाटील, शाळिग्राम मालकर, शरद चौधरी, जिया बागवान ,विजय सुरवाडे, शमिभा, सुजाता ठाकूर ,समाधान सोनवणे आदी उपस्थित होते.