जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे आज दिनांक ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा कार्यालय येथे दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महापौर भारतीताई सोनवणे, महानगर जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा पदाधिकारी राजेंद मराठे, निलाताई चौधरी, राहुल वाघ, सचिन पानपाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, महिला अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, रेखाताई वर्मा, राहुल घोरपडे, जयंत चव्हाण, राहुल कोळी आदी उपस्थितीत होते.