जळगाव प्रतिनिधी । कानळदा येथील राहणाऱ्या माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेचा दोन लाखांसाठी मानसीक व शारिरीक छळ करणाऱ्या पतीसह चार जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर तर मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील सासर असलेल्या २० वर्षीय विवाहितला पती प्रशांत लक्ष्मण कोळी रा. बोरगाव जि. बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) यांनी गेल्या वर्षभरापासून किरकोळ कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. २९ मे २०२० पासून २ सप्टेंबर २०२० दरम्यान पती प्रशांत कोळी, सासू सरला लक्ष्मण कोळी , सासरे लक्ष्मण कोळी, दिर संजय कोळी सर्व रा. बोरगाव जि. बुऱ्हाणगाव व मालाबाई सुखा कोळी यांनी दोन लाखांसाठी वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.
तसेच मानसिक व शारिरीक छळ केला. हा छळ असहाय्य झाल्याने विवाहिता जळगाव तालुक्यातील कानळदा येथील आईवडीलांकडे आली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील करीत आहे.