भुसावळ : शहरासह परिसरातील अनेक रुग्णांना डायलिसिस साठी जळगाव व अन्य ठिकाणी जावे लागत असे परंतु शहरातील आयडीबीआय बेंक शेजारी सुराणा राईस टावर जवळ श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अत्यावश्यकसेवे सोबतच डायलिसिस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे .
श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लॉकडाउन काळातही अहोरात्रअविरत सेवा देत आहे. रुग्णालयाच्या अत्यावश्यक सेवेचा लाभ रुग्णांना होत आहे . किडनी आणि अन्य आजाराच्या रुग्णांना डायलिसिसची आवश्यकता भासत असते. अशा रुग्णांना नियमित डायलिसिस करावे लागते.
पूर्वी हि सुविधा भुसावळ परिसरात नसल्याने जळगाव व अन्य ठिकाणी रुग्णाला जावे लागत असे , डायलिसिस सुविधा शहरात सुरु झाल्याने अनेक रुग्णांना सोयीचे होणार आहे . अत्यावश्यक सेवा सोबतच डायलिसिस युनिट रुग्ण सेवेसाठी २४ तास उपलब्ध झाले आहे .