जळगाव – जिल्हा दिव्यांग सेनेच्या माध्यमातून 3 डिसेंबर दिव्यांग जागतिक दिन या दिवशी जळगाव महानगरपालिकेच्यासमोर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून उपोषण करण्यात आले.
दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी, महाराष्ट्र सचिव भरत जाधव, जळगाव दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन सर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना चांगलेच धारेवर धरले होते. व प्रशासनाला दिव्यांग बांधवांचा कल्याणकारी 5% निधी खर्च करण्यासाठी भाग पाडले. 2011 पासून ते 2020 पर्यंत एकूण 5% दिव्यांग कल्याणकारी निधी रक्कम 9 कोटी 88 लाख एवढी रक्कम महानगर पालिकेकडे शिल्लक आहे.
तरी महानगरपालिकेचा भोंगळ कारभार सुरू होता. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आणून देण्यासाठी दिव्यांग सेनेच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना जागी करण्यात आले. त्यांनी ताबडतोब 7 लाखाचा चेक 350 दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये ४ डिसेंबर रोजी वर्ग करण्यात आला व पुढील रक्कम येत्या मार्च महिन्याच्या आत ही रक्कम अजून काही दिव्यांग बांधव सुटले असतील तर नवीन नावे नोंदवून ते रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. त्यावेळेस दिव्यांग सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी व महानगरपालिका उपायुक्त यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सचिव भरत जाधव, जळगाव जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन, उपाध्यक्ष शेख शकील, सचिव हितेश तायडे यांचे उपोषण सोडण्यात आले.
दिव्यांग सेनेला जळगाव जिल्हा जागृत जनमंच अध्यक्ष शिवराम पाटील, संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशिय संस्था जळगांव अध्यक्ष गणेश पाटील, नाथ फांउडेशनचे अशोक लाडवंजारी, सुनिल भैय्या माळी, डॉ.सरोज पाटील, यमुना पाटील यांचा दिव्यांग सेनेला पाठिंबा दिला होता. सहसचिव ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा संघटक प्रदीप चव्हाण, जळगाव शहर अध्यक्ष भीमराव म्हस्के, राहुल कोल्हे जिल्हा सल्लागार, नितीन सूर्यवंशी, भारत पाटील एरंडोल तालुका अध्यक्ष, आरती पाटील चोपडा तालुका अध्यक्ष, वासुदेव वाघ धरणगाव तालुका अध्यक्ष, मुन्ना चौधरी सचिव, नितीन महाजन फैजपूर शहर अध्यक्ष, नाना मोची फैजपूर उपाध्यक्ष, विनायक कोळी रावेर तालुका अध्यक्ष, भगवान कोळी रावेर तालुका उपाध्यक्ष, पराग वारके रावेर तालुका सचिव,विशाल दांडगे, नंदलाल कुलथे, जिजाबराव माळी, भागवत माळी, जीतू पाटील, किशोर नेवे, आनंदा अहिरे, जगु सोनवणे, गणेश पाटील, प्रवीण भोई, राजेंद्र वाणी, संगीता प्रजापत, शाकीर खान, दादामिया खान, अखिलोद्दीन शहा, महाजन, कैलास कुवर समस्त दिव्यांगबांधव, दिव्यांग सेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.