जळगाव- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तांबापुर मधील गौतम नगर मधील डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास क्षितिज फाउंडेशन तर्फे माल्यार्पण करण्यात आले.
तुमच्या कड़े दोन रुपये असतील तर एक रुपयांची भाकरी घ्या आणि एक रुपयांची पुस्तक. भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक जगावे कसे हे शिकवेल असे सांगणारे संशोधक,पत्रकार, लेखक, समाजशास्त्रद्य, इतिहासकार, सविधानाचे जनक, बौद्ध साहित्याचे अभ्यासक, गोरगरीब कामगाराचे उद्धारक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अमूल्य आहे.
यावेळी रिपाई महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, अविनाश पारधे, प्रभाकर सोनवने, प्रविण वाघ, संदीप वारुळे, मुकेश सपकाळे, शुभम सपकाळे, सागर सुरवाडे, अजय पारधे, रोहित सोनवने, राहुल ससाने, गोलु वाघ उपस्थित होते.