जळगाव – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प वि पाटील विद्यालय व ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने भाषणे केली तर काही विद्यार्थ्यांनी गीतांच्या माध्यमातून महामानवाला आदरांजली व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उजाळा करून दिला.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, डी. ए. पाटील, सरला पाटील, धनश्री फालक, सुधीर वाणी आदी उपस्थित होते.