जळगांव – भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम समाजसेविका निवेदिता ताठे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
तसेच शाह बिरादरीचे अध्यक्ष अजमल शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी व समाजात केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेविका निवेदिता ताठे व अभेद्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली झाल्टे,कमल केशव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती म्हस्के यांना अजमल शाह यांचा हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी मौलाना आझाद संस्था अध्यक्ष फिरोज शेख,अजमल शाह, निवेदिता ताठे, अँड.राज देशमुख,जे. सि.आय.झोन उपाध्यक्ष जिनल जैन,शरद भालेराव,जे.सि.आय.अध्यक्ष सुशील अग्रवाल,कमल केशव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती म्हस्के,अभेद्य फाऊंडेशन अध्यक्षा वैशाली झाल्टे आदींनी उपस्थित राहून अभिवादन केले.