जळगाव प्रतिनिधी । ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा’ या आवाहानुसार सर्वजण पुढे जातील अशी अपेक्षा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी व्यक्त केली. आज सकाळी ११ वाजता जळगाव रेल्वेस्थानक समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
भारतीय राज्यघटनेचे निर्माता शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जळगाव रेल्वे टेशन येथील रेल्वे स्थानक येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्हा सहकारी बँकच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे खेवलकर , हाजी गफ्फार मलिक साहेब , राष्ट्रवादीचे महानगरप्रमुख उपमहापौर सुनील खडके, युवक महानगर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, अशोक लाडवंजारी , राजु मोरे , लीलाधर तायडे, दुर्गेश पाटील, सुनील माळी , मुकुंदराव सपकाळे तसेच सचिन धांडे उपस्थित होते .