जळगाव – केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर आणि प्र. के. अत्रे यांचे पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान होते.
याबाबत त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध अनुभव कथन केले. सतत अध्ययन आणि चिंतन यातून बाबासाहेबांचा देशाच्या संविधाना निर्मितीत मोलाचा सहभाग आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी योगदान दिले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.केतन चौधरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात ग्रंथालयांचे महत्व याविषयी अशी माहिती दिली.
विविध ग्रंथांचा अभ्यास करून देशाला आदर्श राज्यघटना निर्माण करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन केले या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे, सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एन एस सी चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रवीण कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.