जळगाव, प्रतिनिधी । शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सारांश फाउंडेशनतर्फे शहरातील बेघर नागरिकांना ब्लॅंकेट व बिस्कीट वाटप करण्यात आले.
सारांश फाउंडेशनतर्फे गोलाणी मार्केट जवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील व शहरातील इतर भागातील गोर गरीब नागरिकांना ब्लॅंकेट व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे , उपाध्यक्ष इंदू मोरे, सचिव संध्या सपकाळे, विमल साळुंखे, आशा केदारे, शारदा तायडे, संगीता पगारे, नर्मदाबाई भालेराव, जिजाबाई दाभाडे, कुसुम बिऱ्हाडे, इंदुमाते मोरे, मंगला सपकाळे, सुनिता सपकाळे, रंजना मोरे आदी उपस्थित होते.