जळगाव प्रतिनिधी । शहरातील विठ्ठल पेठ परिसरातून हॉटेल मालकाची अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उशीरा उघडकीला आली आहे. दुचाकीधारकाच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गाडी मालक विवेक पुरूषोत्तम पाटील (वय-३५) रा. विठ्ठल पेठ, जुने जळगाव, हे हॉटेल मालक आहेत. त्याचे शहरातील का.ऊ. कोल्हे शाळेजवळ हॉटेल श्री नावाचे हॉटेल आहे. हॉटेलच्या कामानिमित्त त्यांच्याकडे (एमएच १९ एजी ४४२९) क्रमांकाची दुचाकी आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांनी हॉटेल श्रीच्या गेटसमोर दुचाकी पार्कींगला लावली.
अर्धातासानंतर म्हणजे ११ वाजता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. रविवारी दिवसभर दुचाकीचा शोध घेतला असता मिळाली नाही. रविवारी रात्री शनी पेठ पोलीसात धाव घेतली. विवेक पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. संदीप पाटील करीत आहे.