नशिराबाद ता.जि. जळगाव । येथील एज्युकेशन ऑड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सय्यद बरकत अली युसूब अली यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्याहस्ते नियुक्तीपत्र ५ डिसेंबर रोजी देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक मजहर पठाण, माजी सरपंच पंकज महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे विनोद रंधे, नजीर अली, देवा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवक चंदू पाटील, सुनील पाटील, आबा पाटील, अनिल पाटील, अज्जु पिजांरी, मोबीन पठाण, असिफ अली, सादिक शाह यांच्यासह परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.