मुंबई – राज्यात आज 5 हजार 834 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर दिवसभरात 4 हजार 922 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आतापर्यंत 17 लाख 15 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात मागील चोवीस तासांमध्ये कोरोनामुळे 95 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाचा मृत्युदर 2. 58 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 12 लाख 5 हजार 118 नमुन्यांपैकी 18 लाख 47 हजार 509 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत 758 रुग्ण 402 कोरोनामुक्त, 18 जणांचा मृत्यू
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सलग सातव्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या हजारच्या आत आली आहे. आज दिवसभरात 758 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 402 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध दीर्घकालीन आजार असलेल्या 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत 18 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 10 हजार 889 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणार्यांची एपूण संख्या 2 लाख 59 हजार 539वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 257 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 13 हजार 262 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 19 लाख 71 हजार 736 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 85 हजार 260 वर पोहोचली आहे.