Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आता रशियाने केली कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात

by Divya Jalgaon Team
December 6, 2020
in राष्ट्रीय
0
आता रशियात झाली कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात

मॉस्को – संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनामुळे जगभरातील लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशातच संपूर्ण जगाचे कोरोनावरील प्रभावी लसीकडे लक्ष लागले आहे. कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशातच अंतिम टप्प्यात अनेक लसींची चाचणी आहे. मात्र सर्वात आधी कोरोनावरील प्रभावी लस ‘Sputnik V’ तयार केल्याचा दावा रशियाने केला होता. रशियाने आता लसीकरणालाही सुरुवात केली आहे.

आता रशियाने केली कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात

रशियाने कोरोना लसीच्या लसीकरणात आघाडी घेतली आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला रशियामध्ये सुरुवात झाली असून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये ‘Sputnik V’ या रशिया निर्मीत कोरोना लसीचा डोस देण्यात येत आहे. डॉक्टर, आरोग्यसेवक अशा हायरिस्क वर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे. मॉस्कोमध्ये शनिवारी लसीकरणासाठी 70 लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियामध्ये लसीकरण करताना ज्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. अशा लोकांना प्राधान्य दिले जात आहे. Sputnik V लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. तसेच या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत.

दरम्यान, लसीचे सकारात्मक परिणामांनंतरही सामूहिक परीक्षण अद्याप सुरु आहे. हजारो लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मॉस्कोचे मेयर संगेई सोबयानिन म्हणाले की, शाळेतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आमि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ही लस सर्वात आधी उपलब्ध करण्यात येईल. सर्व रुग्णांना 21 दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.

अजून वाचा 

मोदी सरकारचा निर्णय: कोरोना व्हायरसवरची लस पुढच्या आठवड्यात

Share post
Tags: #Mosco#RasiaCorona VaccineDivya JalgaonInternational NewsMarathi NewsSputnik VVaccineआता रशियात झाली कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवातआता रशियाने केली कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवातरशियालसीकरणाला सुरुवात
Previous Post

माझ्या मनात भाजप सोडण्याचा विचारही नाही : खा. रक्षा खडसे

Next Post

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

Next Post
बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group