मुंबई : मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या सात तासांत कापणे समृद्धी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाने शक्य होणार आहे. या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शनिवार, 5 डिसेंबर)ला करणार आहेत. या दौऱयात ते अमरावती आणि संभाजीनगर जिह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.
यावेळी ते बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करतील. याशिवाय, मुख्यमंत्री दोन्ही जिल्ह्यातील इतर महामार्गाच्या कामांचाही आढावा घेतील. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.
120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांतील आणि 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे.