जळगाव – आपला भारत देश हा कृषीप्रधान असून जय जवान जय किसान हा आपला नारा आहे. शेतकरी हा संपूर्ण देशवासीयांचा पोशिंदा व अन्नदाता आहे. कृषी क्षेत्र हा आपला पाठीचा कणा आहे.
असे असताना सुद्धा केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन नवे कृषी कायदे संमत केले आहे. हे कायदे मुळातच देशभरातील शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता हे विधेयके मंजूर केली आहे. या कायद्यांमुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मोडतोड करून भांडवलदारांच्या ताब्यात देण्याची कृती सुरू आहे. कोरडवाहू आणि आर्थिक दृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल.
म्हणून हे सर्व कृती व तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही थांबविण्यात यावी तसेच दिल्लीत शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द होण्यासाठीआंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन, जळगाव तर्फे आज दि. 4/12/2020 शुक्रवार रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आंदोलन करून शेतकरी पाठिंबा जाहीर केलेला आहे. तसेच याप्रसंगी केंद्र सरकारचे निषेध करण्यात आलेला आहे.
याप्रसंगी वापस लो वापस लो तीनो कृषी विधेयक वापस लो, जय जवान जय किसान, जो किसान हित की बात करेगा वही देश पर राज करेगा, किसान भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है, किसानो पर अत्याचार नही सहेगा हिंदुस्तान, मुर्दाबाद मुर्दाबाद जालीम सरकार मुर्दाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर महामहीम राष्ट्रपती साहेब भारत सरकार नवी दिल्ली यांना मा जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्याद्वारे निवेदन पाठविण्यात आले.
याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, दिनेश लखारा, सुरज गुप्ता, शफि ठेकेदार, सय्यद उमर, मुकेश परदेशी, शेख सलीम उद्दीन, मोहम्मद खान, इलियास नूरी, सय्यद इरफान, शेख शाकिब, मो. फारूक तेली, शेख वसीम, शेख नजीर उद्दीन, सय्यद ओवेश अली, शेख नदीम, शेख नूर मोहम्मद, सय्यद अता ए मोइन, .उपस्थित होते