जळगाव – गौण खनिजाप्रकरणी गैरव्यवहार झाल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी झाली होती.यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती मात्र जिल्हा परिषदेकडून पुढील कारवाई केली जात नसल्यामुळे आज जलव्यवस्थापन समितीच्या सभेत हा मुद्दा जि प सदस्या पल्लवी सावकारे यांनी जोरदारपणे मांडला याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जिपच्या जलव्यवस्थापन समितीची सभा आज दिनांक 4 डिसेंबर रोजी 1 वाजता छत्रपती शाहू महाराज सभागृहात ना. जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी. उपाध्यक्ष लालचंद पाटील,जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे,पल्लवी सावकारे, रोहन पाटील, रजनी चव्हाण,आदी उपस्थित होते. गौण खनिजांच्या पावत्यांचा मुद्दा सभेत गाजला होता.याबाबत प्रशासनाकडून चौकशी समितीला कागदपत्रे दिली जात नसल्यामुळे चौकशीचे काम झालेले नाही.त्यामुळे कारवाईदेखील रखडलेली आहे.
याबाबत जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी प्रशासनाला धारेवर धरले कार्यकारी अभियंता निकम व राधेश्याम सोनवणे यांना पाठीशी घालत आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला. तसेच राधे शाम सोनवणे यांच्या निलंबनाची मागणी सदस्यांनी केली. प्रशासन कारवाई करत नसेल तर न्यायालयात जाण्याचा इशारा सावकारे यांनी दिला.
राधेश्याम सोनवणे यांच्या कडील उप अभियंता पदाचा कार्यभार काढल्यानंतर देखील ते सभागृहात उपस्थित राहील्याने त्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी सभागृहा बाहेर काढले पंधरा दिवसात चौकशी व कार्यवाही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांच्याकडून केली जाईल असे आश्वासन मिळाल्यानंतर या विषयावर पडदा पडला.