जळगाव : जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. आज पुन्हा बरे होणार्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्ण अधिक आढळून आल्याचे अहवालात दिसून येत आहे. जिल्ह्यात आज ५५ नवे रुग्ण आढळून आहे आहे. तर ५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५४ हजार ७३८ झाली आहे. त्यात उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५२ हजार ९३० आहे. जिल्ह्यात सध्या ५०५ रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज पर्यंत १३०३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर- ०८, जळगाव ग्रामीणी-०१, भुसावळ-१२, अमळनेर-०१, चोपडा-०३, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-०४, यावल-००, एरंडोल-०१, जामनेर-०१., रावेर-१, पारोळा-००, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-०८, बोदवड-००, इतर जिल्हे-०१ असे एकूण ५५ रुग्ण आढळले आहेत.