जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा न्यायालयात ठेवीदारांची फसवणूकीच्या विविध ८१ गुन्ह्यांच्या खटल्याची सुनावणी कोरोनामुळे थांबली होती. परंतू उद्या शनिवारी बीएचआरचे संचालक प्रमोद रायसोनीसह १३ जणांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी होणार आहे.
बीएचआरचे संचालक प्रमोद रायसोनीसह १३ जण ठेवीदारांची फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल ८१ गुन्ह्यांच्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या खटल्याची नियमित सुनावणी थांबली होती. परंतू आता ५ डिसेंबर रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी होणार आहे.
बीएचआरचे संचालक प्रमोद रायसोनी व १३ संचालकांना २०१५मध्ये अटक करण्यात आली आहे. ते आता जिल्हा कारागृहात बंदी आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. त्यानुसार सीआयडीने तपास करून काही गुन्ह्यांचे दोषारोप, पुरवणी दोषारोप न्यायालयात दाखल केले आहेत.