जळगाव – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए. टी .झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनाचा सार अतिशय साध्या व बोलीभाषेत मांडणाऱ्या निसर्गकन्या ,खान्देशकन्या ,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेचे मुख्या.डी. व्ही.चौधरी यांच्या हस्ते बहिणाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अरे संसार संसार …. , एका एका कोबांतून परगटले दोन पानं…., माझी माय सरोस्वती….इत्यादी गीते विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सादर करून बहिणाबाई यांना अभिवादन केले तर शिक्षकांनी बहिणाबाईंच्या जीवनाकार्याची माहीती करून दिली.
प्रसंगी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , मुख्या.रेखा पाटील , योगेश भालेराव , डी.ए. पाटील , देवेंद्र चौधरी , सरला पाटील आदी उपस्थित होते.