मेष : अपेक्षित गाठीभेटी होतील कौटुंबक सौख्य लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.
वृषभ : आजचा दिवस लिखाणासाठी अनुकूल आहे. अनावश्यक प्रवास टाळणे हिताचे आहे. महिलांनी कुवतीबाहेरील कामे टाळावी. शेजार्याचा त्रास वाटेल.
मिथुन : आपल्या गोड बोलण्यामुळे महत्वाची कामे पूर्णत्वास जातील. अनुकूल संधी चालून येतील सुवर्ण खरेदीस अनुकूलदिवस आहे. प्रतिष्ठीत बडय़ा व्यक्तींचे सहकार्य लाभेल.प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.
कर्क : कौटुंबिक सुखात व्यत्यय येण्याची शक्यता रहाते. परिचयातून कामे होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल.
सिंह : नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशगमनास आजचा दिवस अनुकूल आहे. अचानक खर्च उद्भवेल. काका-आत्यांचासवास लाभेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल.
कन्या : मित्रपरिवारांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. आजा दिवस गुतवणूकीसाठी अनुकूल आहे. सहकार्यांबरोबरमिष्टान्नभोजनाचा योग येईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता वाटेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.
तूळ : तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. पूर्वी केलेल्या एखाद्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. लॉटरीचेतिकिट घेऊन पहा, यश संभवते. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल.
वृश्चिक : नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपले निर्णय ग्राह्य धरले जातील. मौल्यवान वस्तू खरेदीचा योग आहे. आध्यात्मिकप्रगतीस अनुकूल दिवस आहे. नोकरीत स्थिरता लाभेल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्यांवर अवलंबून राहू नका.
धनु : भागिदारीचा व्यवसाय करणार्यांचे कार्यक्षेत्र वाढेल. जुनी येणी वसूल होतील. आपल्या हातून दानधर्म होईल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल.
मकर : उपवर तरुणांना जोडीदार निवडण्यास अनुकूल दिवस आहे. शत्रूंपासून सावध रहा. महत्वाची कागदपत्रे मिळतील,व्यावसायिक करारमदार होतील. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल.आगंतुकपाहुणे येण्याची शक्यता राहते.
कुंभ : विरोधकांवर मात कराल. महत्वाची कामे आजच पूर्ण करा. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल.
मीन : संततीच्या शैक्षणिकप्रगतीमुळे धन्यता वाटेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सुग्रास भोजनाचायोग आहे. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल.