जळगाव – केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज महाविद्यालयात ऑनलाइन युवती सभेचे उद्घाटन प्रा.डॉ. सीमा बारी यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या देशाचे सामर्थ्य देशातील युवक आणि युवतींवर अवलंबून आहे त्यासाठी त्यांचे सर्वांगीण दृष्टीने सक्षमीकरण झाले पाहिजे .महिलांनी सर्व क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणे आवश्यक आहे आजही महिला दुय्यम भूमिकेत कामकाज करतात .नोकरी करणाऱ्या महिलांना तर अधिकच जास्तीचे काम करावे लागते, म्हणून युवतींच्या व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे, यासाठी महाविद्यालयात युवतींचे सक्षमीकरण काळाची गरज या विषयावर डॉ.सीमा बारी यांनी मार्गदर्शन केले
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ.मनीषा इंदानी यांनी व्यक्तिमत्व विकासात तंत्र विज्ञानाचे उपयोजन या विषयावर मार्गदर्शन केले महिलांना सर्व आधुनिक माहिती तंत्र विज्ञानाचे उपयोजन करण्याची क्षमता आत्मसात केली पाहिजे , त्याआधारे नवनवीन ज्ञान प्राप्त करणे शक्य होते. तिसऱ्या सत्रात व्यक्तिमत्व विकासात सॉफ्ट स्किल चा विकास होणे आवश्यक आहे त्यासाठी संवाद कौशल्य ,नेतृत्व, निर्णय क्षमता, समायोजन क्षमता ,अभिव्यक्ती, व्यावहारिक दृष्टिकोन यासारखे कौशल्य आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकसित होण्यात मदत होते असे प्रा. डॉ.सुनिता नेमाडे यांनी प्रतिपादन केले.
चौथ्या सत्रात प्रा.संदीप केदार यांनी प्रसारमाध्यमात महिलांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले, आज प्रसारमाध्यमांमध्ये विविध दूरदर्शन वाहिन्यांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात कार्यरत असून आपलं कौशल्य विकसित करीत आहेत .कार्यशाळेचे शेवटी प्राचार्य अशोक राणे यांनी युवतींचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने या कार्यशाळेच्या आयोजनासाठी आर्थिक मदत केली जाते त्याबद्दल विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. युवतींनी व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षण , खेळ ,व्यवसाय ,कला, नाट्य ,उद्योग या क्षेत्रात विविध कौशल्य आत्मसात करून व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी एकविसाव्या शतकात मोठी संधी उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले
या कार्यक्रमाच्या संयोजक प्रा. अंजली बन्नापुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते. त्यांना डॉ. गणेश पाटील, मोनिका सोळुंके ,तेजस्विनी वाणी यांनी सहकार्य केले.