जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज नऊ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.
जळगाव शहर- १६, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१३, अमळनेर-३, चोपडा -०, पाचोरा -०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल -०, एरंडोल -०, जामनेर -१, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर -०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील -० असे एकुण ४० रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ८७८ बाधित आढळले आहे. यापैकी ५२ हजार ८७८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ५०३ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही तर ४८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा कोवीडी रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.