Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चौधरी वाड्यातील बहिणाबाई स्मृती संग्रहालयात ६९ वा स्मृतीदिन साजरा

by Divya Jalgaon Team
December 3, 2020
in जळगाव
0
चौधरी वाड्यातील बहिणाबाई स्मृती संग्रहालयात ६९ वा स्मृतीदिन साजरा

जळगाव – बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे जळगाव येथील चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाबाई चौधरी यांच्या ६९ व्या स्मृतिदिन साजरा करण्यात आले. प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणती प्रियंका चौधरी, शोभाबाई चौधरी, प्रिया चौधरी, वैशाली चौधरी, हितेंद्र चौधरी, मनस्वी चौधरी, राजेंद्र हरिमकर उपस्थित होते.

बहिणाईंच्या परिवारातील सदस्य, चौधरी वाड्यातील सदस्यांच्या उपस्थितीत लोकशाही टिव्हीवर ऑनलाईन प्रसारीत झालेल्या ‘अरे संसार संसार’ कार्यक्रमसुद्धा बघितला गेला. परिवर्तन जळगावच्या महाराष्ट्राभर गाजत असलेल्या बहिणाईंची गीते आणि कवितांची सुरेल मैफल, ‘अरे संसार संसार’च्या माध्यमातून चौधरीवाड्यातील सदस्यांनी अनुभवली. दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, रंजना चौधरी यांनी सहकार्य केले. दिवसभर स्मृतीसंग्रहालयाला साहित्यप्रेमींनी भेटीसुद्धा दिल्यात.

बहिणाई स्मृती संग्रहालयाची वैशिष्ट्ये

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. ‘अरे संसार संसार’ म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात.

Share post
Tags: Bahinabai Smruti SangrahalayDivya JalgaonJalgaonMarathi Newsचौधरी वाड्यातील बहिणाबाई स्मृती संग्रहालयात ६९ वा स्मृतीदिन साजरा
Previous Post

विविध मागण्यांसाठी दिव्यांग सेनेचे उपोषण

Next Post

जिल्हा रुग्णालयात लवकरच नॉन-कोविड रूग्णांवर उपचार

Next Post
'शावैम' मध्ये ५५ जणांनी घेतला कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस

जिल्हा रुग्णालयात लवकरच नॉन-कोविड रूग्णांवर उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group