जळगाव – दि ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन असन तो संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात असतो. मात्र दिव्यांग बांधवांना मागण्यांसाठी नाईलाजाने महानगरपालिका, जळगाव येथे कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागले आहे.
या मागणीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव शहर महानगरपालिकेच्या दिव्याग बांधवांना आजपावेतो ५% राखीव निधीची वाटप केलेले नाही, हा निधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा, महानगरपालिकेच्या उभारण्यात आलेल्या शॉपींग कॉम्प्लेक्स मध्ये दिव्यांग व्यक्तीकरिता गाळे उपलब्ध करुन देणे, म.न.पा.च्या जागेत दिव्यांग बांधवांना झुणका भाकर केंद्रासाठी साधारण २०० चौ.फुट जागेची परवानगी देण्यात यावी.
दवाखान्यांमध्ये दिव्यांगांना मोफत उपचाराची सुविधा, दिव्यागांना स्वयं रोजगार चालू करणेसाठी म. न.पा.च्या मालकीची जागा ही स्टॉल लावणेसाठी मिळणेवावत. ५१% निधीमधून दिव्यांग बांधवांना घरपट्टीत सुट मिळणे, मतिमंद मुलांच्या पालक संघटनांना सहाय्य अनुदान देणे, तसेच कायम स्वरुपी औषधोपचाराची सुविधा देणे, दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार सुरु करणेसाठी झेरॉक्स मशिन द्याव्या, दिव्यांग बांधवाना घरकुल योजना देण्यात यावी, कर्णबधिर व्यक्तींसाठी विविध प्रकारची उपकरणे, शैक्षणिक संच देण्यात यावे, अशा विविध मागण्या नमूद केल्या आहेत.
या निवेदनावर दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील शेख मुतालीक, हरीराम तायडे, योगीता जाधव, इकमोद्दिन शेख, संगिता प्रजापत, किशोर नेवे, प्रदिप चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, नितीन सुर्यवंशी, तोसिफ शहा, मिलींद पाटील, गणेश पाटील,मतीन शेख यांच्यासह इतर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.