जळगाव – राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी खळबळजनक दावा केला की, मी भाजपात असतांना जाणीवपूर्वक मला भाजपा सोडण्यास भाग पडले. अशी परीस्थिती अशी निर्माण करण्यात आली. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सुमारे महिना भरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी प्रवेशानंतर बुधवारी प्रथमच त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात मेळावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. तसेच खडसे म्हणाले की, ‘बहुजनांना न्याय देणार्या पक्षात आलो, शरद पवार यांनी मला प्रवेश दिला त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो, असे देखील खडसे म्हणाले.
यादरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बीएचआर घोटाळा प्रकरणावरून खडसे यांना काही काम नसल्याची टीका केली होती. याला
देखील खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बीएचआर घोटाळा प्रकरणावरून खडसे यांना काही काम नसल्याची टीका केली होती. याला प्रत्युत्तर देतांना एकनाथराव खडसे यांनी बीएचआर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश हे भाजप सरकारच्या कालावधीत देण्यात आल्याचे सांगत याला प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले की, भाजपचे सरकार असतांना या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. केंद्र सरकारने हे निर्देश दिले असले तरी राज्य सरकारने ही चौकशी दडपून ठेवली. यामुळे दरेकर यांच्या माहितीची आपल्याला किव करावीशी वाटत असल्याचे ते म्हणाले. तर जलयुक्त शिवार ही योजना चांगली असली तरी यात घोळ झाला असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला.