Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी (UDID) कार्डचे वाटप

भुसावळ पंचायत समिती दिव्यांग कक्षाचा उपक्रम

by Divya Jalgaon Team
December 3, 2020
in जळगाव
0
दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी (UDID) कार्डचे वाटप

भुसावळ  – सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा समाज कल्याण विभाग जि.प. अंतर्गत पंचायत समिती भुसावळ येथे दिव्यांग अटी नियम कायदा 2016 कलम 25 अन्वये तालुकानिहाय स्वतंत्ररित्या दिव्यांग व्यक्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन कक्ष याद्वारे बुधवारी दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड (UNIQUE DISABILITY ID CARD) यांचे वाटप करण्यात येत आहे.

पंचायत समिती भुसावळ कार्यालय येथे सभापती मनीषा पाटील ,गटविकास अधिकारी विलास भाटकर, माजी सभापती सुनील महाजन, सहाय्यक गटविकास अधिकारी उमेश पाटणकर, कैलास काळे कक्ष अधिकारी, राजेंद्र फेगडे व कल्पना रावळ, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचे हस्ते स्वावलंबन कार्डचे वितरण करण्यात आले.

आतापर्यंत 58 दिव्यांग लाभार्थ्यांना यूआयडी कार्डाचे वाटप झाले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, भाजपा तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सदानंद उन्हाळे, दिलीप वऱ्हाळे, दिव्यांग कक्षाचे परिचर कलाशिक्षक गिरीश बडगुजर व सर्व पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती. शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार विविध 21 प्रकारचे अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना योजनेचा सरळ व सुलभरित्या लाभ होत आहे.

भुसावळ तालुक्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना कक्ष परिचारक, कलाशिक्षक गिरीश बडगुजर दिव्यांग लाभार्थ्यांना यु.डी. आय.डी .कार्ड संदर्भात व शासन सवलती संदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. भुसावळ तालुक्यातील सर्व वयोगटातील दिव्यांगांनी महिन्याच्या प्रत्येक बुधवारी शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजनांची माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे. 0 ते 6 वर्षे वयोगटातील दिव्यांग बालकांना शीघ्र निदान व उपचार केंद्र या योजने मार्फत विशेष शाळेबद्दल मार्गदर्शन तसेच दिव्यांगांना व्यवसाय प्रशिक्षण व पुनर्वसन या बाबत माहिती, दिव्यांग ओळखपत्र UDID कार्ड, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन या कक्षामार्फत देण्यात येत आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsMarathi NewsUNIQUE DISABILITY ID CARDदिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी (UDID) कार्डचे वाटप
Previous Post

मला भाजपा सोडण्यासाठी जाणीवपूर्वक भाग पाडले- एकनाथराव खडसे

Next Post

विधान परिषद निवडणुकीत अमरिशभाई पटेल विजयी

Next Post
विधान परिषद निवडणुकीत अमरिशभाई पटेल विजयी

विधान परिषद निवडणुकीत अमरिशभाई पटेल विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group