जळगाव- बीएचआर घोटाळ्या प्रकरणी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ललवाणी यांनी गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर शिवारातील बोदवड रोड व शहापूर रोडवरील सुमारे २५ कोटी रुपयांची जमीन कवडलीमोल भावात विकत घेतली असल्याचा आरोप केला आहे.
बीएचआर घोटाळ्या प्रकरणी पारस ललवाणी यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, ललवाणी यांची चौकशी झाल्यानंतर ते जामनेर येथे परतले असता त्यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली असून या पत्रकार परिषदेत बीएचआर प्रकरणी माझ्याकडे बरेच पुरावे आहेत.
तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी २५ कोटी रुपयांची जमीन केवळ १ कोटी ते सव्वा कोटी रुपयात विकत घेतली असून गिरीश महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काय काय पराक्रम केले आहे याची माहिती मी आर्थिक गुन्हे शाखेला दिली असल्याची माहिती ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


