Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेल विजयी

काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव

by Divya Jalgaon Team
December 3, 2020
in राजकीय, राज्य
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेल विजयी

धुळे: धुळे – नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव केला आहे. भाजपच्या अमरीश पटेल यांना 332, तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत, त्यामुळे अमरीश पटेल यांचा विजय झाला असून, त्यांची अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे.

अमरिश पटेल विरोधकांची 133 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. काँग्रेसच्या किमान 57 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. महाविकास आघाडीची 213 मते असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 1 डिसेंबरला 99 टक्के मतदान झालं होतं. आज (3 डिसेंबर )मतमोजणी झाली असता भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरिश पटेल आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील या दोघांमधून कोण बाजी मारणार, याची उत्कंठा ताणली गेली होती. अखेर चित्र स्पष्ट झालं असून, भाजपचे अमरिश पटेल विजय झाले आहेत. धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं जड असल्यानं भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजपाच्या गोटातून व्यक्त होत आहे. अखेर तो खरा ठरला आहे.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा 12 मार्च 2020 हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली होती. भाजपतर्फे माजी मंत्री अमरिश पटेल तसेच महाविकास आघाडीतर्फे भाजप मधून काँग्रेस पक्षात आलेले अभिजित पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली असून, अमरिश पटेलांनी बाजी मारली आहे. अमरिश पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी ही निवडणूक झाली आहे.

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले 412 तर स्वीकृत 28 सदस्य असे एकूण 440 सदस्य मतदानासाठी पात्र होते. मात्र, धुळे महानगरपालिकेतील लोकसंग्राम पक्षाच्या सदस्या हेमा अनिल गोटे ,तसेच शिंदखेडा नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत सदस्य राजेंद्र भामरे यांनी राजीनामा दिला होता. धुळे महानगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरविले होते, त्यामुळे विधान परिषदेसाठी मतदान करणार्‍या सदस्यांची संख्या 437 झाली होती.

धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदार संघात भाजपचे 199, काँग्रेसचे 157, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेनेचे 20, एमआयएमचे 9, समाजवादी पक्षाचे 4, बसपा , मनसेचा प्रत्येकी एक, अपक्ष 10 सदस्य मतदार होते. 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय म्हणजेच 99 टक्के मतदान झालं होतं. अखेर या मतदानाचा अमरिश पटेल यांना फायदा झाला आहे.

Share post
Tags: #Amrish Patel Winner#DhulebjpBJP Amrish PatelCongressDhule Latest newsDhule-Nandurbar Local Body ElectionsDivya JalgaonElectionMarathi NewsNandurbarNandurbar latest newsPoliticalPolitical NewsWinsअभिजित पाटीलअमरिश पटेलअमरिश पटेल विजयीकाँग्रेसधुळे - नंदुरबारधुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेल विजयीभाजपस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेल विजयी
Previous Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ३ डिसेंबर २०२०

Next Post

MDH मसाला कंपनीचे मालक महाशय धर्मपाल यांचे आज निधन

Next Post
MDH मसाला कंपनीचे मालक महाशय धर्मपाल यांचे आज निधन

MDH मसाला कंपनीचे मालक महाशय धर्मपाल यांचे आज निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group