मेष : आपली महत्वाची कामे सकाळीच करून घ्या, संध्याकाळ कौटुंबिक समारंभासाठी राखून ठेवावी लागेल. घरगुती कामासाठी प्रवास करावे लागतील. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांत विश्वास निर्माण करेल.
वृषभ : नोकरी-व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. अनुकूल संधीचा लाभ घ्या. संध्याकाळी संततीकडून सुवार्ता समजेल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.
मिथुन : दुपारनंतर आपल्याला धनप्राप्तीसाठी अनुकूल काळ आहे. आपल्याला मानसिक स्वास्थ लाभेल. आपल्या संभाषणचातुर्यामुळे वरिष्ठांना जिंकून घ्याल. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल.
कर्क : छोटे प्रवासयोग संभवतात. आपले मानसिक स्वास्थ सुधारेल. आर्थिक उन्नतीसाठी आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.
सिंह : मित्र परिवाराकडून आर्थिक मदत घेताना विचार करावा. व्यवसाय वाढीसाठी परिश्रम घ्यावे लागतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.सल्लामसलत करावी लागेल.
कन्या : नोकरीत सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. आपल्या इच्छा पूर्ण होतील. चालून आलेल्या अनुकूल सुसंधीचा लाभ घ्या. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील.
तूळ : नोकरीत सुवर्णसंधी चालून येईल. अपेक्षित यश संभवते. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. कामानिमित्त परदेशप्रवास घडून येण्याची शक्यता राहते.
वृश्चिक : अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. पूर्वी केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. विरोधकांवर मात कराल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल.
धनु : सामाजिक ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल वैवाहिक सुखाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे सकाळीच पूर्ण करा. काही बाबतीत आपल्याला चांगला दिलासा मिळणार आहे. आपले अंदाज अचूक ठरतील.
मकर : आपले विचार दुसर्यांना बोलून दाखवू नका. महत्वाची कामे टाळावीत. जनसंपर्कातून कामे करावी लागतील. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. प्रवास सुखकर होईल.
कुंभ : संततीच्या दृष्टीने भाग्यकारक घटना घडेल मानसिक अस्वस्थता जाणवेल. नोकरीत सुवर्णसंधीचा लाभ घ्याल. शेजार्यांचे सहकार्य लाभेल.
मीन : आपल्या हातून धार्मिक लिखाण होईल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी होण्यास अनुकूल काळ आहे संतसज्जनांचा सहवास लाभेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.