जळगाव प्रतिनिधी । मुळजी जेठा महाविद्यालयात मेस्ट्रो राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ८ डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक कन्व्हेनर डॉ .ए .पी .सरोदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वर्षी असलेल्या कोरोना महामारीमुळे शासकीय नियमांचे पालन करून आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जपणे महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलविले जाणार नाही. स्पर्धकांना आपल्या घरून या स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे यासाठी हि स्पर्धा या वर्षी नाविन्यपूर्ण रितीने ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे.
मेस्ट्रो स्पर्धा चार विभागामध्ये विभागली गेली आहे. विद्यार्थ्यांचे कला, कौशल्य, नावीन्यपूर्णता, नवीन तंत्रज्ञान या सारख्या गुणांचा विकास व्हावा या करिता पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन, अड्वर्टाइसमेन्ट डेव्हलोपमेंट, क्वीज कॉम्पिटिशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या चार स्पर्धा घेण्यात येणार आहे .सदरच्या स्पर्धेमध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद , बुलढाणा, अकोला, मुंबई या सारख्या ठिकाणाहून तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात विचारणा होऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
या स्पर्धेचे कन्व्हेनर डॉ .ए .पी .सरोदे आणि ऑर्गनाइझिंग सेक्रेटरी डॉ .संगीता पाटील आहेत .सदरच्या स्पर्धेकरिता नाव नोंदणी प्रा. नितीन चौधरी यांच्याकडे करावी. या स्पर्धेची सर्व सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर दिलेली आहे .