जळगाव प्रतिनिधी । बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्यात ठेविदारांकडून मूळ पावत्या घेऊन त्यांना फक्त २० वा ३० टक्के रक्कमच देण्याचा प्रकार या प्रकरणात समोर आला आहे. ठेविदारांच्या पावत्या जमा करून त्यांना अल्प रक्कम देत कोट्यवधींची माया जमा करण्याच्या गोरखधंद्यात विवेक ठाकरेसह आता अन्य दलालांची माहिती देखील समोर आली.
बँकेतील घोटाळ्यात ठेविदारांकडून मूळ पावत्या घेऊन त्यांना फक्त २० व ३० टक्के रक्कमच देण्याचा प्रकार या प्रकरणात समोर आला आहे. यात ठेवीदार संघटनेच्या नावाखाली विवेक ठाकरे हा प्रमुख भूमिका बजावत होता. यासोबत आता अन्य काही दलालांची नावेदेखील समोर आली आहेत. यात उदय कांकरिया, अजय हसमुखचंद ललवाणी, रमेशचंद्र पगारिया, अशोक रूणवाल, निलेश भोईटे, विरेंद्र भोईटे, सचिन पाटील, आकाश माहेश्वरी, विजय ओरा, हेमंत पाठक व राशिक भेलवल या नावांचे समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विवेक ठाकरे याला पहिल्या टप्प्यातच अटक करण्यात आलेली आहे. यामुळे आता अन्य दलालांची चौकशी होईल का? त्यांना अटक करण्यात येईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.